रिगाव इस्लामपूर लिफ्ट इरिगेशन योजना सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:52+5:302021-06-25T04:13:52+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील पूर्णा नदीवरील रिगाव-इस्लामपूर लिफ्ट इरिगेशन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावी या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुका ...

रिगाव इस्लामपूर लिफ्ट इरिगेशन योजना सुरू करा
मुक्ताईनगर : तालुक्यातील पूर्णा नदीवरील रिगाव-इस्लामपूर लिफ्ट इरिगेशन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावी या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फैजपूर येथील कार्यक्रमप्रसंगी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.
यासोबतच मुक्ताईनगर तालुक्यातील जलद गतीने टिकाकरण, मिनी एमआयडीसी, मराठा तथा ओबीसी समाजाला आरक्षण या मागण्यांचादेखील समावेश होता.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष राजू शर्मा, कुऱ्हा शहर अध्यक्ष रामराव पाटील, बाळू कांडेलकर, पुनाजी इंगळे, अनिल पाटील, विलास वाघ, दादाराव पाटील, अमोल इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, विठ्ठल पाटील, अरुण पाटील, अक्कर सिंग पावरा, विलास सोनावणे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.