भरड धान्य ज्वारी, मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST2021-09-18T04:17:56+5:302021-09-18T04:17:56+5:30

हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदाच्या हंगाम २०२०-२१ भरड धान्य ज्वारी, मका खरेदीसाठी १७ सप्टेंबरपासून शेतकरी नाव नोंदणी सुरू ...

Start registration for the purchase of coarse grains, sorghum and maize | भरड धान्य ज्वारी, मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू

भरड धान्य ज्वारी, मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू

हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदाच्या हंगाम २०२०-२१ भरड धान्य ज्वारी, मका खरेदीसाठी १७ सप्टेंबरपासून शेतकरी नाव नोंदणी सुरू झाली आहे. मुक्ताईनगर येथील शेतकी संघात जाऊन शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन शेतकी संघाने केले आहे.

खरेदी दर मका १८७० रुपये क्विंटल, ज्वारी २७३८ रुपये क्विंटल अशी आहे. नाव नोंदणी मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.

नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सन २०२१ खरीप हंगाम ऑनलाईन ई.पीक नोंदणी असलेला तलाठ्याचा ७/१२ स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा, प्रिंटेड बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स अशी सर्व कागदपत्रे घेऊन मुक्ताईनगर शेतकी संघ येथे नोंदणी करावी, असे आवाहन संघाचे चेअरमन व मॅनेजर यांनी केले आहे.

Web Title: Start registration for the purchase of coarse grains, sorghum and maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.