जळगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 13:16 IST2017-09-24T13:16:09+5:302017-09-24T13:16:51+5:30
स्त्री मुक्तीचा विचार कुटुंबापासून सुरु व्हावा - डॉ.अंजली मायदेव आंबेडकर

जळगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनास प्रारंभ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - स्त्री मुक्तीचा विचार हा कुटुंबापासून सुरू झाला पाहिजे. समाजात वावरताना पुरुष हे पुरोगामी विचार घेवून वावरतात आणि घरात पारंपरिक पद्धतीने वागतात, अशी टीका प्रा.डॉ.अंजली मायदेव आंबेडकर यांनी केली.
जळगावात रविवारी आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजिदभाई शेख, अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकमल पाटील, प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.