जामनेर, जि.जळगाव : कोरोनामुळे शेतकरी वर्गात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन शासनाने मका खरेदी बंद केली आहे. ती त्वरित सुरू करावी अन्यथा लॉकडाउनच्या काळात आंदोलनाची वेळ येईल, असा इशारा माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांनी दिला आहे.यासंदर्भात महाजन यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीचे गाºहाणे मांडले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, यंदा शेतकºयांना मक्याचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र कोरोनामुळे बाजारपेठेची परिस्थिती वाईट आहे. या उत्पादनाच्या विक्रीतून शेतकºयाच्या हाती चांगला पैसा येऊ शकतो मात्र शासनाने पहिल्यांदाच ही खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकºयांकडे असलेला मका हमीभावाने शासनाने खरेदी करावा. कारण व्यापारी वर्ग शेतकºयांची अडवणूक करून निम्मे भावात खरेदी करत आहे. त्यामुळे खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे....तर आंदोलनशेतकºयांचा मका खरेदीस लवकरात लवकर सुरूवात न झाल्यास लॉकडाउनमध्ये याप्रश्नी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात मका खरेदी त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:27 IST
शासनाने मका खरेदी बंद केली आहे. ती त्वरित सुरू करावी.
जळगाव जिल्ह्यात मका खरेदी त्वरित सुरू करा
ठळक मुद्देमाजी मंत्री गिरीश महाजन यांचा शासनाला इशारासरकारकडे मागणी