कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती, दीड कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:08+5:302021-08-21T04:21:08+5:30

चोपडा : वैजापूर येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी किंमत रु. ६७ लाख व देवझिरी येथील शासकीय ...

Staff accommodation repairs, Rs 1.5 crore fund | कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती, दीड कोटींचा निधी

कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती, दीड कोटींचा निधी

चोपडा : वैजापूर येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी किंमत रु. ६७ लाख व देवझिरी येथील शासकीय आश्रमशाळा कर्मचारी निवासस्थानाचे दुरुस्ती करण्यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.

विकासकामांचे भूमिपूजन वैजापूर देवझिरी शासकीय आश्रमशाळा येथे करण्यात आले. यानंतर आमदार लता सोनवणे यांचे हस्ते खावटी अनुदानाचे साहित्य वाटप करण्यात आले.

आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ६० हजार लाभार्थ्यांना खावटी अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, माजी उपसभापती एम.व्ही.पाटील, ए.के. गंभीर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, तालुका संघटक सुकलाल कोळी, गणेश पाटील, प्रताप पावरा, पंडित कोळी, परशुराम पावरा, दत्ता शिंदे, मुकेश पावरा, नायजा बारेला, भागदा बारेला, बहादूर बारेला, मोहना बारेला, धर्मा भिल, मोहना कोकणी, रमेश बारेला, सुरेश बारेला, गोविंदा कोकणी, शिवदास भिल, लक्ष्मी कोकणी, बाळू पावरा, रायसिंग बारेला नितीन कोळी उपस्थित होते.

Web Title: Staff accommodation repairs, Rs 1.5 crore fund