शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये एसटी बसला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 09:30 IST

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शनिवारी रात्री दीड वाजता एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

जळगाव : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शनिवारी रात्री दीड वाजता एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसाचे वातावरण असल्याने चालक आणि वाहक हे  एसटीपासून दूर असल्याने थोडक्यात बचावले आहे.  

अमळनेरहून मांडळ येथे जाणारी बस रात्री साडे नऊ वाजता मांडळ येथे पोहचते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बस क्र. एम एच १४ बी टि ४१९ ही रात्री साडे नऊला मांडळला पोहचली होती.  चालक व वाहक बसमध्ये किंवा टपावर झोपतात. मात्र पाऊस असल्याने चालक सुशील हिरालाल चव्हाण व वाहक शरद गव्हाणे हे गावाबाहेरील गावदरवाज्याशेजारी झोपले होते रात्री सुमारे दीड वाजता एसटीला आग लागल्याची घटना समोर आली. 

चालक व वाहक बाहेर असल्याने ते बचावले आहेत. गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्यास सुरुवात केली. अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली होती मात्र तोपर्यंत आग विझवण्यास गावकऱ्यांना यश आले. मात्र या भीषण आगीत बसचा आतील भाग पूर्णपणे जळाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एसटी पेटली की पेटवली याबाबत अद्याप संशय असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :fireआगJalgaonजळगाव