बलात्काराच्या गुन्ह्यात एसआरपीएफ जवानाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:30+5:302021-06-28T04:13:30+5:30

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या जितेंद्र करतार जाधव (रा. वसंतनगर, ता. पारोळा, ह.मु. जळगाव) ...

SRPF jawan arrested for rape | बलात्काराच्या गुन्ह्यात एसआरपीएफ जवानाला अटक

बलात्काराच्या गुन्ह्यात एसआरपीएफ जवानाला अटक

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या जितेंद्र करतार जाधव (रा. वसंतनगर, ता. पारोळा, ह.मु. जळगाव) या अमरावती येथे कार्यरत असलेल्या सीआरपीएफ जवानाला रविवारी शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. जितेंद्र व पीडित तरुणी शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना अभ्यासिकेच्या ठिकाणी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. २०१८ ते २०२१ या कालावधीत जितेंद्र याने जळगाव, अमरावती, पुणे, पारोळा व गुजरातमधील नाडियाद या ठिकाणी पीडितेला हॉटेल व लॉजवर नेऊन अत्याचार केला होता. लग्नाला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने ११ मे रोजी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी रविवारी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे ॲड. रंजना पाटील यांनी बाजू मांडली.

Web Title: SRPF jawan arrested for rape