शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आढळला गंगा, ब्रह्मपुत्रेतील ‘स्पॉटेड सेल बार्ब’ मासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 07:04 IST

‘स्पॉटेड सेल बार्ब’ची मत्स्य अभ्यासकांनी घेतली नोंद

अजय पाटील  

जळगाव : गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये आढळणाऱ्या ‘स्पॉटेड सेल बार्ब’ या माशाची जिल्ह्यातील वाघूर धरणात नोंद झाली आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मत्स्य अभ्यासकांनी ही नोंद केली आहे. ‘टॅप्रोबॅनिका’ या इंडोनेशियाच्या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत या अभ्यासकांचा शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे.     वन्यजीव संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे यांच्या पुढाकाराने बाळकृष्ण देवरे आणि कल्पेश तायडे यांनी ‘शोध गोड्या पाण्यातील माशांचा’ याद्वारे ३४ प्रजातींची नोंद घेतली आहे. त्यात ‘स्पॉटेड सेल बार्ब हा महाराष्ट्रात प्रथमच दिसला आहे.

२०२१ मध्ये झाली होती नोंद ‘स्पॉटेड सेल बार्ब’चा शोध बंगालच्या ईशान्य भागातून हॅमिल्टनने १८२२ मध्ये लावला. अगोदर हा मासा फक्त गंगा आणि ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांमध्येच  आढळायचा. २०१५ मध्ये हा मासा तामिळनाडूमध्ये मिळाल्याची नोंद आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील वाघूर धरण बॅक वॉटरमध्ये या माशाला शोधून काढले.  

काय आहेत वैशिष्ट्ये?  अभ्यासक गौरव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या माशांचे खोल शरीर, शंकूच्या आकाराचे डोके, पंख फिकट नारिंगी असतात. नरांमध्ये हा रंग थोडा गडद असतो. लांबी साधारण ३.५ सेंटिमीटर असते. तापी व तिच्या उपनद्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून जलीय जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात हा मासा वाघूर धरणातील जलीय वनस्पतींमध्ये आढळून आला.

खान्देशातील जलाशयांवर स्थानिक माशांच्या प्रजातींच्या अधिवासावर तीलापिया, मांगुर, सकरसारख्या परदेशी मत्स्य प्रजातींचे अतिक्रमण बघता स्थानिक माशांच्या संवर्धनाची गरज आहे. नदीपात्रात अवैध वाळू उपसादेखील जलीय परिसंस्था धोक्यात आणत आहे.     - बाळकृष्ण देवरे, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था

 

टॅग्स :fishermanमच्छीमारJalgaonजळगावResearchसंशोधन