आरटीओ कार्यालयात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:04+5:302021-07-08T04:13:04+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी उपप्रादेशिक कार्यालयात ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात ...

आरटीओ कार्यालयात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी उपप्रादेशिक कार्यालयात ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात आले. यात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यात अधिकारी, कर्मचारी, एजंट, विविध संघटना मिळून ५२ जणांनी रक्तदान करून महायज्ञात योगदान दिले.
उपप्रादेशिक कार्यालयातील सभागृहात सकाळी १०.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे रक्तदान संकलित करण्यात आले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ.उमेश कोल्हे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एल.एन. त्रिपाठी, अनिल पाटील, भरत महाले, राजू कुळकर्णी, जनसंपर्क अधिकारी नीलेश पवार, परिचर अरुण चौधरी व प्रभाकर पाटील यांनी या कार्यात सहभाग घेऊन प्रक्रिया पार पाडली. चंद्रशेखर इंगळे यांनी प्रास्ताविक केले.