महिंदळे येथे प्रौढांच्या कोविड लसीकरणास उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:29+5:302021-06-16T04:22:29+5:30
महिंदळे, ता. भडगाव : येथे प्रथमच ग्रामपंचायत कार्यालयात कोविड लसीकरण करण्यात आले. यात साठ वर्षांवरील प्रौढांसाठी ६० लस ...

महिंदळे येथे प्रौढांच्या कोविड लसीकरणास उस्फूर्त प्रतिसाद
महिंदळे, ता. भडगाव : येथे प्रथमच ग्रामपंचायत कार्यालयात कोविड लसीकरण करण्यात आले. यात साठ वर्षांवरील प्रौढांसाठी ६० लस उपलब्ध झाल्या. या लसीकरणाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पिंपरखेड आरोग्य केंद्र जाण्यासाठी परवडण्याजोगे नसल्यामुळे तेथे प्रौढ नागरिक जात नव्हते. त्यामुळे सरपंच व सदस्यांनी पिंपरखेड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रतीक भोसले यांच्याकडे गावात लसीकरणाची मागणी केली. त्यांनीही होकार देत गावात लसीकरण सुरू केले. प्रथम प्रौढांसाठी लसीकरणासाठी ६० डोस उपलब्ध करून दिले. व गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आरोग्य सेविका नीलिमा माळी व आरोग्य सेवक विजय खेडकर यांनी लसीकरण केले. यावेळी सरपंच मोहन पाटील, सदस्य भिकन राजपूत, अंकुश सावकारे, ऑपरेटर कुवरसिंग रजपूत, शिपाई नितीन पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रदीप देवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.