पारोळा-भडगावच्या सीमेवर बिबट्या चटावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:43 IST2019-02-05T17:41:51+5:302019-02-05T17:43:50+5:30

खेडगाव, ता. भडगाव , जि.जळगाव : सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाºया रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या ...

Spoiled on the border of Parola-Bhadgaon | पारोळा-भडगावच्या सीमेवर बिबट्या चटावला

पारोळा-भडगावच्या सीमेवर बिबट्या चटावला

ठळक मुद्देतिसऱ्या गोºह्याचा फडशापेंडगाव, शिवरे व तामसवाडी परिसरात नागरिक भयभितवनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाºया रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या गोºह्यावर बिबट्याने हल्ला चढवत फडशा पाडला. यामुळे पारोळा-भडगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवरील वनास लागून असलेल्या पेंडगाव, शिवरे, तामसवाडी, पथराड, रताळे आदी गावांतील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरे, कॅमेरे आदी लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे यांचा गेल्या काही दिवसांत या भागात उपद्रव वाढला आहे.
२८ रोजी पेंडगावी, दि.१ रोजी तामसवाडी, ता.पारोळा व पुन्हा दि.४ च्या रात्री असे तीन दिवस मिळून या मादी बिबट्याने तीन गोºह्यांचा फडशा पाडला. वनविभागाने हे पंचनामे केले असले तरी पंचनाम्यावरच त्यांचे अडले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कारण बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असतानाच वनविभागाकडृन त्यास पकडण्यासाठी ंिपंजरे, कॅमेरे लावणे आदी काही एक उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथे संताप व्यक्त होत आहे.
या जंगलास लागून भडगाव तालुक्यातील पेंडगाव, पथराड,जुवार्डी,आडळसे तर पारोळा तालुक्यातील शिवरे,तामसवाडी,रताळे आदी गावे येतात. जंगल असल्याने या गावांमधून पशुपालनाचा व्यवसाय वाढला आहे. यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट-तिप्पट जनावरांची संख्या येथे आहे. ही जनावरे शेतात-रानात उघड्यावरच बांधलेली असतात. बिबट्याचा वावर वाढल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. आधीच दुष्काळ, त्यातच मादी बिबट्याचे हल्ले सुरुच असल्याने जनावरांविषयीची चिंता लागली आहे. आज जनावरांच्या रक्ताची चटक लागलेला बिबट्या उद्या रात्री-बेरात्री शेतावर जाणाºया शेतकºयांच्या जीवावर उठणार नाही हे कशावरुन,अशी भीती व्यक्त होत आहे.
जनावरे उघड्यावर बांधू नये
सदर बिबट्याची मादी बहाळ, ता.चाळीसगाव भागातून आली आहे. वनात पाणी नसल्याने त्या शोधात गावांच्या दिशेने आल्यानंतर शेतात उघड्यावर बांधलेल्या गुरांवर ती हल्ला करीत आहे. शेतकºयांनी गुरे सुरक्षित जागी बांधावीत. एक-दोन दिवसात कॅमेरे लावण्यात येतील. पिंजरा आदी उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतींचा तसा ठराव आल्यास वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल.
- कविता पाटील, वनरक्षक

Web Title: Spoiled on the border of Parola-Bhadgaon