अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करा

By Admin | Updated: February 19, 2015 13:13 IST2015-02-18T23:54:18+5:302015-02-19T13:13:00+5:30

एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी येथील तहसीलदार कार्यालयात अवकाळी पावसाच्या हानीसंदर्भात बुधवारी बैठक घेऊन रब्बी पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना गती द्या, अशी सूचना केली.

Speed ​​up the loss of sudden losses | अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करा

अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करा

एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी येथील तहसीलदार कार्यालयात अवकाळी पावसाच्या हानीसंदर्भात बुधवारी बैठक घेऊन रब्बी पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना गती द्या, अशी सूचना केली.
याप्रसंगी तहसीलदार मिनाक्षी राठोड, तालुका कृषी अधिकारी आर.एच.पाटील, मंडळ कृषी अधिकारी शेजवाळकर व संतोष कंखरे, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, तलाठी व शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यात कृषी सहायकांची संख्या चार असून पंचनाम्याच्या कामासाठी तीन कर्मचारी अमळनेर तालुक्यात मागविण्यात आले आहेत. तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक ११ फेब्रुवारीपासून नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. पंचनामे करताना अपुर्‍या मनुष्यबळामुळे कर्मचार्‍यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.
तालुक्याचे रब्बी हंगामाचे क्षेत्र नऊ हजार ९५५ हे. असून आधी ११ डिसेंबर रोजीच्या बेमोसमी पाऊस व त्यानंतर अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

बेटावद बुद्रूक येथे विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार
बेटावद बुद्रूक : येथील डी.पी.ची पेटी पूर्ण मोकळी असून त्यात ना स्वीच आहे ना कटआऊट व काही मोकळ्या स्थितीत आहे. तेथे जर लहान मुले किंवा प्राणी गेले आणि काही विपरित झाले तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. बर्‍याच महिन्यांपासून अश्याच स्थितीत ही पेटी उघडी आहे.
बेटावद परिसरातील तार हे फार वर्षांपूर्वीचे असल्यामुळे ते जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे ते नेहमी तुटतात कधी कधी तर ते मेन रोडवरसुद्धा पडलेले असतात. त्यामुळे लाईट ही नेहमी बंद असते. बर्‍याच ठिकाणची तार इतकी खाली आलेली आहे की ती डोक्याला स्पर्श करते. वारंवार सांगूनसुद्धा महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखादी प्राणहानी झाली तर त्याला जबाबदार विद्युत महामंडळ असेल, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. (वार्ताहर)

Web Title: Speed ​​up the loss of sudden losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.