भादली रेल्वे गेट अंडर बायपास कामाला तातडीने गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:08+5:302021-02-27T04:21:08+5:30
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ या रस्त्याला असलेल्या रेल्वे गेट क्रमांक १५३ जवळ तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ...

भादली रेल्वे गेट अंडर बायपास कामाला तातडीने गती द्या
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ या रस्त्याला असलेल्या रेल्वे गेट क्रमांक १५३ जवळ तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणामुळे रेल्वे विभागाकडून रेल्वे गेट नं १५३ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहे. परिणामी लोकप्रतिनिधी व स्थानिक शेतकरी यांनी प्रशासनाकडे प्र.जि.मा.क्र.१८ वरील वाहतूक तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वारंवार पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून अवजड वाहनांसाठी रेल्वे गेट नं १५२ ते १५३ समांतर रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे. व छोट्या वाहनांसाठी रेल्वे गेट नं १५३ च्या जागी रेल्वे अंडर बायपास मंजूर केला असून त्यासाठी लागणारे एलएचएस बॉक्स जागेवर तयार केले आहे. मात्र सद्या कामाची गती नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.