लोंढ्रीतांड्याच्या शेतातील चाऱ्याचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 20:14 IST2019-12-09T20:13:32+5:302019-12-09T20:14:09+5:30

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी लोंढ्री तांडा येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधित शेतातील चाºयाचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी घेण्यात आले.

The specimen of the charioteer in Londritanda will go to the Pune Experiment School | लोंढ्रीतांड्याच्या शेतातील चाऱ्याचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत जाणार

लोंढ्रीतांड्याच्या शेतातील चाऱ्याचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत जाणार

ठळक मुद्देजिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून पाहणीमृत जनावरांची संख्या आता २६

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी लोंढ्री तांडा येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधित शेतातील चाºयाचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, सोमवारी पहाटे आणखी तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे आता मृत जनावरांची संख्या आता २६ झाली आहे.
जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश इंगळे यांनी सोमवारी बाधित जनावरांची पाहणी करून पहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयलाल राठोड यांच्यासह शेतकºयांकडून माहिती जाणून घेतली. बाधित जनावरांना चारण्यात आलेल्या संबंधित शेताची त्यांनी पाहणी केली आहे. याच शेतातील चाºयाचे नमुने घेण्यात आले आहे. हा नमुना रोग अन्वेषण पशुसंवर्धन विभाग पुणे येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बाधित जनावरे दहा ते पंधरा गंभीर आहेत.
मृत जनावरे
सोमवारी हिवरसिंग राठोड, दीपक हंसराज व सुरेश राघो चव्हाण यांच्या प्रत्येकी एका बैलाचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत मृत गुरांची संख्या २६ झाली आहे.
 

Web Title: The specimen of the charioteer in Londritanda will go to the Pune Experiment School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.