जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मनपात विशेष यशवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:15+5:302020-12-05T04:25:15+5:30
तेजस चौधरी, सुमित गुरव, उज्वल चव्हाण, मोहित वाणी, उमर शेख जावेद, कुणाल पवार, योगेश पाटील, अनिकेत चौधरी, ऋषिकेश बागुल, ...

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मनपात विशेष यशवंतांचा सत्कार
तेजस चौधरी, सुमित गुरव, उज्वल चव्हाण, मोहित वाणी, उमर शेख जावेद, कुणाल पवार, योगेश पाटील, अनिकेत चौधरी, ऋषिकेश बागुल, राहील शेख मुनाफ, जयेश सोनवणे, प्रमोद सोनवणे,आयेशा अन्सारी, विशाल शिरसाळे, श्लोक पाटील, जैद अन्सारी, हितेश दहिकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याच सन्मान सोहळ्यात व्यावसायीक पंकज जंगले व सारिका जंगले या दाम्पत्याने हितेश दहीकर या प्रज्ञाचक्षू विदयार्थ्याला शैक्षिणक साहित्याची मदत केली आणि आपल्या आईंच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्व यशवंत विद्यार्थ्यांना स्वखर्चाने बक्षीसे दिली. आरंभी दिव्यांगांसाठी महान कार्य करणाऱ्या लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्तींनी आयकर अधिकारी व स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी बनण्याचा मनोदय बोलून दाखवला. काही विद्यार्थ्यांनी संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचाही मनोदय बोलून दाखवला.
कार्यक्रमासाठी पंकज जंगले, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. विशाखा जोशी, मनपाच्या शिक्षण विभागातील प्रभारी समन्वयक शेख वसीम, लेखाधिकारी गणेश चौधरी, एम आय एस समन्वयक प्रीती सुरंगे,विशेष शिक्षक शरद कोळी ,समाधान माळी, विशेष शिक्षिका भारती चौधरी,अश्विनी पाटील, वृषाली चौधरी , संगणक परिचर सुरज साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन
फोटो : ०५सीटीआर१८
: जागतिक दिव्यांग दिनानिमत्त मनपा शिक्षण मंडळ येथे सन्मानित करण्यात आलेल्या १८ दिव्यांग गुणवंतांसोबत मान्यवर.