शुक्रवारपासून सुरत-अमरावती दरम्यान विशेष गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST2021-02-23T04:25:20+5:302021-02-23T04:25:20+5:30

चालविण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. आठवड्यातून शुक्रवार व रविवार हे दोन दिवस ही गाडी धावणार असून, या गाडीला जळगाव ...

Special train between Surat-Amravati from Friday | शुक्रवारपासून सुरत-अमरावती दरम्यान विशेष गाडी

शुक्रवारपासून सुरत-अमरावती दरम्यान विशेष गाडी

चालविण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. आठवड्यातून शुक्रवार व रविवार हे दोन दिवस ही गाडी धावणार असून, या गाडीला जळगाव स्टेशनलाही थांबा देण्यात आला आहे. सुरतहून दुपारी सव्वाबारा वाजता निघाल्यावर ही गाडी जळगावला

सायंकाळी पावणेसहा वाजता येणार आहे. तर जळगावहून सुरतसाठी दुपारी पावणेदोन वाजता असणार आहे.

जिल्हा परिषदेसमोर वाहतूक कोंडी

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर दररोज वाहतूक कोंडी होत

आहे. यामुळे पादचारी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक

विभागाने रस्त्यावरील उभ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

जळगाव : शहरात ठिकठिकाणी उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटल्या असून, या विक्रेत्यांकडून उघड्यावरच

अन्न पदार्थ विक्री करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तरी

मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागण होत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

जळगाव : सोमवारी सायंकाळी शहरातील फुले मार्केट परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. विशेष म्हणजे काही नागरिक विनामास्क आढळून आले. तरी मनपा प्रशासनाने या

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

महामार्गावरील विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

जळगाव : शहरातील महामार्गालगत ठिकठिकाणी खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटल्यामुळे वाहतुकीला अडथ‌ळा ठरत आहे. या ठिकाणी येणारे नागरिक रस्त्यालगत वाहने उभी करत असल्यामुळे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना

अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Special train between Surat-Amravati from Friday