हिंमत जाधव यांना विशेष सेवा पदक
By Admin | Updated: November 29, 2015 00:15 IST2015-11-29T00:15:53+5:302015-11-29T00:15:53+5:30
धुळे : नक्षलग्रस्त भागात कठीण व खडतर परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक हिंमत हिंदूराव जाधव यांना राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

हिंमत जाधव यांना विशेष सेवा पदक
धुळे : नक्षलग्रस्त भागात कठीण व खडतर परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक हिंमत हिंदूराव जाधव यांना राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले आहे. येत्या 26 जानेवारी रोजी हे पदक त्यांना प्रदान होण्याची शक्यता आहे.
पोलीस उपअधीक्षक म्हणून 2011 मध्ये हिंमत जाधव यांची पोलीस दलात निवड झाली. 2012 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड जिल्ह्यात त्यांचा वर्षभर परीविक्षाधिन कालावधी गेला.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक म्हणून पहिल्या नेमणुकीत ते नक्षलग्रस्त असलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोली उपविभागात कार्यरत होते. त्याठिकाणी त्यांनी कठीण परिस्थितीतही केलेल्या विशेष कामगिरीची राज्य शासनाने दखल घेतली आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण करणा:या राज्यातील 21 पोलीस अधिका:यांची या विशेष सेवा पदकासाठी निवड झाली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याबाबतची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.