सव्वातीन हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

By Admin | Updated: October 18, 2015 23:51 IST2015-10-18T23:51:15+5:302015-10-18T23:51:15+5:30

धुळे : जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून आतार्पयत 3 हजार 374 हेक्टरवर पेरणी झाली आह़े

Sowing of Rabbi on Thirty-three thousand hectares | सव्वातीन हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

सव्वातीन हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

धुळे : जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून आतार्पयत 3 हजार 374 हेक्टरवर पेरणी झाली आह़े त्यात सर्वाधिक 1 हजार 954 हेक्टरवर ज्यारीची पेरणी करण्यात आली़ त्यानंतर 907 हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आह़े

जिल्ह्यात रब्बी पिकांची लागवड सुरू झाली असून आहे. कृषी विभागाने 107470 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात सर्वाधिक 45 हजार हेक्टर पे:याचे उद्दिष्ट गव्हाचे तर त्या खालोखाल 38 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभ:याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान लागवडीस सुरुवात झाली झाली असून जिल्ह्यात आतार्पयत 3 हजार 374 हेक्टरवर पेरणी झाली आह़े त्यात ज्वारी 1 हजार 954 हेक्टर, मका 907 हेक्टर तर हरभ:याची 513 हेक्टरवर पेरणी झाली आह़े खरिपात पावसाने दगा दिल्याने रब्बीकडून शेतक:यांच्या मोठय़ा आशा आहेत. शिरपूर तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 476 हेक्टरवर पेरणी झाली आह़े त्यानंतर शिंदखेडा तालुका 1088 हेक्टर व धुळे तालुक्यात 810 हेक्टरवर पेरणी झाली आह़े धुळे तालुक्यात ज्वारी 350 हेक्टर, मका 400 हेक्टर, हरभरा 60 हेक्टर, शिंदखेडा तालुक्यात ज्वारी 700 हेक्टर, मका 250 हेक्टर, हरभरा 138 हेक्टर तर शिरपूर तालुक्यात ज्वारी 904 हेक्टर, मका 257 हेक्टर व हरभरा 315 हेक्टरवर लावण्यात आला आह़े तर साक्री तालुक्यात अद्याप पेरणीस सुरुवात झालेली नाही़

Web Title: Sowing of Rabbi on Thirty-three thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.