अमळनेरात ज्वारी व मका खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:28 IST2020-05-16T15:27:27+5:302020-05-16T15:28:34+5:30
ज्वारी व मका खरेदी केंद्र अमळनेर येथे येत्या आठ दिवसात सुरू होणार आहे.

अमळनेरात ज्वारी व मका खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार
ठळक मुद्देशेतकरी बांधवांनी शेतकी संघात आॅनलाइन नोंदणी करावीसदर खरेदी केंद्र लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा
अमळनेर, जि.जळगाव : ज्वारी व मका खरेदी केंद्र अमळनेर येथे येत्या आठ दिवसात सुरू होणार असून यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अमळनेर शेतकी संघात आॅनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सदर खरेदी केंद्र लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
अमळनेर येथे बारदान आणि गोडाऊन उपलब्ध झाल्यानंतर लागलीच हे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. शेतकरी बांधवाना माल विक्रीसाठी नोंदणी आवश्यक असल्याने सदरची आॅनलाइन नोंदणी अमळनेर शेतकी संघात करावी, असे आवाहन आमदारांनी केले आहे.