त्वचारोगावर आता अत्याधुनिक उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:53+5:302021-09-03T04:17:53+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग व गुप्तरोग विभागात अत्याधुनिक दोन मशीन्स दाखल झाल्या असून यामुळे ...

त्वचारोगावर आता अत्याधुनिक उपचार
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग व गुप्तरोग विभागात अत्याधुनिक दोन मशीन्स दाखल झाल्या असून यामुळे सामान्यांवर आधुनिक पद्धतीने मोफत उपचार शक्य होणार आहे. मायक्रोडर्मा अब्रेजन, क्यू-स्विच्ड एन् डी याग लेझर अशा या दोन मशिन्स आहेत. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी पाहणी गुरुवारी त्यांची पाहणी केली.
यावेळी डॉ. स्नेहल लोळगे, डॉ. स्मिता पवार, डॉ. राज शाह उपस्थित होते. या अत्याधुनिक यंत्रांमुळे स्विच्ड लेझर मशिनींमुळे गोंदण, टॅटू काढणे, जन्मखूण काढणे, त्वचेवरील वंगावर उपचार करणे, काळे डाग काढणे शक्य होणार आहे. तर लेझर कार्बन पील ही वेदनारहित प्रक्रिया आहे. त्वचेची प्रत व दर्जा सुधारण्यासाठी तसेच पिंपल्स, पिंपल्सचे डाग, त्वचेवरील मोठे छिद्र, पिंपल्सवरील इतर उपचार करण्यासाठी ही मशीन काम करते. तसेच मायक्रोडर्मा अब्रेजन नवीन प्रकारचे यंत्र आहे. त्वचेची पुनरुत्पादक क्षमता सुधारण्यासाठी, त्वचेवरील डाग काढणे, रंगद्रव्य यासारख्या त्वचेच्या स्थितीच्या उपचारात प्रभावी आहे. ह्या मशीनद्वारे त्वचेवरील मृतपेशी नियंत्रित आणि सौम्यपणे काढून टाकण्यास मदत करते. रुग्णालयातील ओपीडी कक्ष क्रमांक ३०२ येथे सकाळी ९ ते १ या वेळेत सर्व नागरिकांना उपलब्ध आहेत. नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावीत यांनी केले आहे.