अन् गाडी थांबताच फुकट्या प्रवाशांची झाली पळापळ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:44+5:302021-02-27T04:22:44+5:30
सध्या कोरोना काळात ज्या रेल्वे गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना तिकीट आरक्षित करून प्रवास करण्याला परवानगी देण्यात आली आहे. ...

अन् गाडी थांबताच फुकट्या प्रवाशांची झाली पळापळ..
सध्या कोरोना काळात ज्या रेल्वे गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना तिकीट आरक्षित करून प्रवास करण्याला परवानगी देण्यात आली आहे. असे असताना अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार शुक्रवारी रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या सूचनेनुसार वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी. पाठक यांच्यासह १४ तिकीट निरीक्षकांच्या पथकाने जळगाव स्टेशनवर सकाळपासूनच कारवाई मोहीम राबविली. या कारवाई मोहिमेत पाच आरपीएफ जवानांचीही मदत घेण्यात आली होती.
दिवसभरात ६९ प्रवाशांवर कारवाई
तिकीट निरीक्षकांच्या पथकाने जळगाव स्टेशनवर अप व डाऊनच्या थांबा असलेल्या रेल्वे गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटांची तपासणी केली. स्टेशनवर येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर तिकीट निरीक्षकांनी उभे राहून ही कारवाई केली. दिवसभरात अशा एकूण ६९ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तसेच दंड न भरणाऱ्या पाच प्रवाशांना ताब्यातही घेण्यात आले.