पथकाची चाहूल लागताच रस्त्यावर वाळू उपसून केला पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:46+5:302021-07-18T04:12:46+5:30
नांदेड, ता. धरणगाव : ट्रॅक्टरांद्वारे रात्रीच्या वेळी नांदेड-साळवा रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असताना पथकाची चाहुल लागताच वाळूने ...

पथकाची चाहूल लागताच रस्त्यावर वाळू उपसून केला पोबारा
नांदेड, ता. धरणगाव : ट्रॅक्टरांद्वारे रात्रीच्या वेळी नांदेड-साळवा रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असताना पथकाची चाहुल लागताच वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूलाच खाली करून ट्रॅक्टरचालकांनी खाली ट्रॅक्टर घेऊन पोबारा केला.
१६ च्या रात्री अवैध वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर साळव्याकडे जात असताना वाळू चोरट्यांना पथकाची चाहूल लागली आणि त्यांनी तीनही वाळूने भरलेले ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला अंतराअंतराने खाली करून रिकाम्या ट्रॅक्टरांसह पोबारा केला. रस्त्याच्या कडेला तीन ठिकाणी वाळूचे ढीग दिसून आले. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून चोरटी अवैध वाहतूक होत असल्याला पुष्टी मिळाली आहे.
दरम्यान, ती गाडी महसूल विभागाची होती की पोलिसांची, हे मात्र समजू शकले नाही. मात्र रात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास गाडी आली होती, असे समजते.