शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच समान बांधकाम नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:20 IST

जळगाव : राज्यातील सर्वच शहरात बांधकामाविषयी समान नियमावलीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी बांधकाम ...

जळगाव : राज्यातील सर्वच शहरात बांधकामाविषयी समान नियमावलीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली. या सोबतच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणविषयक नाहरकत परवानगी राज्यस्तरावरच देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.क्रेडाई महाराष्ट्र या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय शिखर संघटनेतर्फे बांधकाम व्यावसायिकांसाठी मुंबई येथे ६ व ७ जानेवारी रोजी ‘महाकॉन २०२०’ या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी निमंत्रित आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतूराज पाटील यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उत्तर देताना वरील ग्वाही दिली.‘रायझिंग अबोव्ह’ असे ब्रीदवाक्य घेऊन झालेल्या अधिवेशनासाठी तीनही आमदारांसह क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट सतीश मगर, ‘महारेरा’चे चेअरमन गौतम चॅटर्जी, शेअर बाजार गुंतवणुकविषयक मार्गदर्शक राकेश झुनझुनवाला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जळगावमधून या अधिवेशनासाठी क्रेडाईच्या राज्य शाखेचे सहसचिव अनिश शहा, जळगाव शाखा अध्यक्ष निर्णय चौधरी, पुष्कर नेहेते, आबा चव्हाण, चंदन कोल्हे, सागर ताडे तसेच राज्यातील तालुका व जिल्हास्तरीय ५७ शाखांमधून ७०० ते ७५० बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिक प्रथमच एकत्र आले, असे क्रेडाईच्यावतीने सांगण्यात आले.बांधकाम व्यवसायामुळे इतर व्यवसायांनाही चालनानवीन सरकारमधील तरुण आमदारांचे महाराष्ट्राबद्दल काय ‘व्हीजन’ आहे, या दृष्टीने खास आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतूराज पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी आपल्या व्हीजनविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, २५० घटक एकत्र येऊन बांधकाम आकाराला येते. पर्यायाने या व्यवसायावर तेवढेच घटक अवलंबून असतात व बांधकामामुळे त्यांना चालनाही मिळते.त्यामुळे बांधकाम व्यवसायाच्या अडचणी सोडवून त्याच्यासह सर्वच क्षेत्राला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.राज्यात सध्या बांधकामाविषयी प्रत्येक शहरात वेगवेगळी नियमावली आहे. ती टाळून आता समान नियमावली राबविण्यासाठी सरकारतर्फे धोरण निश्चित करण्यात येईल, असे तीनही आमदारांनी सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव