खंडणीसाठी मुलाचा खून; दोघांना जन्मठेप

By Admin | Updated: May 31, 2017 03:43 IST2017-05-31T03:43:54+5:302017-05-31T03:43:54+5:30

खंडणीसाठी १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी शेवगेतांडा (ता. पारोळा) येथील मोतीराम रोहिदास पवार

Son's murder for ransom; Both of them gave birth to life | खंडणीसाठी मुलाचा खून; दोघांना जन्मठेप

खंडणीसाठी मुलाचा खून; दोघांना जन्मठेप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर (जि. जळगाव) : खंडणीसाठी १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी शेवगेतांडा (ता. पारोळा) येथील मोतीराम रोहिदास पवार व मोरसिंग सोनू पवार या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
मोतीराम व मोरसिंग यांनी रणछोडदास पवार याच्याकडून ऊसतोड कामागारांना देण्यासाठी दोन लाख रुपये घेतले आणि परस्पर खर्च केले. परतफेडीसाठी पैसे नसल्याने त्यांनी ३ आॅक्टोबर १४ रोजी रणछोडदास यांचा मुलगा अरुण (१४) याचे अपहरण केले व दोघांनी गळा आवळून त्याचा खून केला आणि मृतदेह नाल्याच्या कपारीत पुरला.

Web Title: Son's murder for ransom; Both of them gave birth to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.