शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

सोनबर्डी खडके खुर्द वळणावर दुचाकीला अपघात; गारखेडाचा युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 22:32 IST

दुचाकीच्या अपघातात गारखेडाचा युवक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देअंधारात वळण लक्षात न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

लोकमत न्यूज नेटवर्क

एरंडोल : सोनबर्डी खडके खुर्द येथील वळणावर दुचाकीच्या अपघातात गारखेडाचा युवक जागीच ठार झाला.

सचिन मधुकर पाटील (२५, गारखेडा, ता. धरणगाव) हा तरुण दुचाकी (एमएच१९बीआय२५३७) या दुचाकीने कासोद्याकडून एरंडोलकडे येत असताना सोनबर्डी फाट्यापासून थोड्या अंतरावरील खडके खुर्दकडे जाणाऱ्या  रस्त्याच्या वळणावर पहाटेच्या अंधारात वळण लक्षात न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. त्यात दुचाकीचालक सचिन पाटील हा जागीच ठार झाला.

उजेड पडल्यावर सोनबर्डी फाट्यावरील वीटभट्टीचालकांच्या अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याबाबत खडके खुर्द पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना कळविले. त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख राजू पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

ग्रामस्थांचा रास्ता राेको एरंडोल कासोदा रस्त्यावरील हे वळण काढण्यात यावे, या मागणीसाठी कासोद्याच्या ग्रामस्थांनी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातErandolएरंडोल