खासगी बसमधून सोनसाखळीसह पर्स लंपास
By Admin | Updated: April 10, 2017 03:41 IST2017-04-10T03:41:52+5:302017-04-10T03:41:52+5:30
पुणे येथून जळगावला नातेवाईकाकडे येत असलेल्या उज्ज्वला किरण चौधरी यांची पर्स समर्थ कृपा ट्रॅव्हल्सच्या

खासगी बसमधून सोनसाखळीसह पर्स लंपास
जळगाव : पुणे येथून जळगावला नातेवाईकाकडे येत असलेल्या उज्ज्वला किरण चौधरी यांची पर्स समर्थ कृपा ट्रॅव्हल्सच्या बसमधून लांबवल्याची घटना रविवारी सकाळी शहरात उघडकीस आली. या पर्समध्ये पाच तोळ्याच्या सोनसाखळीसह सहा हजार रुपये रोकड होती असे चौधरी यांचे म्हणणे आहे. याची तक्रार पहूर पोलिसांत देण्यात आली आहे.
दोन सोनसाखळ्या लंपास
दोन वृद्धांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याच्या घटना जळगावात रविवारी सकाळी घडल्या. पहिल्या घटनेत मोटारसायलवरून आलेल्या दोघांपैकी एक जण पत्ता विचारत असताना दुसऱ्याने कानशिलात लगावून नलिनी प्रल्हाद भोळे (७२, रा. वर्षा कॉलनी) यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी लांबविली, तर दुसऱ्या घटनेत रेखा चंद्रकांत कोठारी (७४, रा. विसनजी नगर) यांची दहा तोळ्यांची साखळी लांबविली. (प्रतिनिधी)