शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आधीच त्यांचे गाव लांब, मग काय विचारता! जळगावमध्ये शिकायला आलेले काही विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी घरी जाताच आले नाही

By अमित महाबळ | Updated: October 23, 2022 22:14 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत.

जळगाव : दिवाळीचा सगळीकडे उत्साह आहे. बाहेरगावी शिक्षण वा नोकरीसाठी गेलेले जळगावात परतले आहेत. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासमवेत दीपोत्सव साजरा करत आहे पण जळगावमध्ये बाहेरगावहून शिकायला आलेले काही विद्यार्थी असेही आहेत, की त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जाता आलेले नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत. ऋची झा ही विद्यार्थिनी एमबीबीएसच्या चतुर्थ वर्षाला आहे. ती चार वर्षांपासून जळगावात शिकायला आहे. आताची तिची दुसरी दिवाळी अशी आहे, की तिला घरी जाता आलेले नाही. परिवारासोबत दिवाळी साजरी करता येत नसल्याची रूखरूख तिच्या मनात आहे. तिचे गाव (कोची) केरळमध्ये आहे. जळगावहून गावी जायला दोन दिवस लागतात आणि पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. त्यामुळे अभ्यासाला महत्त्व द्यावे लागत आहे.

ती जळगावात, बहिण दिल्लीत, भाऊ केरळमध्ये -ऋची हिची बहीण सिव्हील सर्व्हिसची तयारी करण्यासाठी दिल्लीत आहे. लहान भाऊ, आई व वडील केरळमध्ये आहेत. हॉस्टेल लाईफची सवय झाली आहे. दिवाळीचा आनंद म्हणून एक दिवस अभ्यासातून सुटी घेईल, सगळ्या जणी मिळून जेवायला जाऊ. तेच आमच्यासाठी सेलिब्रेशन असेल, असे ऋची म्हणाली. हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनी दिवाळीसाठी आपापल्या गावी गेलेल्या आहेत.

रेल्वे वा विमानाने जा, मिरांगासाठी प्रवास बराच मोठा -नवी पेठेतील विद्यार्थी वसतिगृहात राहणारा मिरांगा हा मूळचा अरूणाचल प्रदेशातील आहेत. इटानगरजवळ त्याचे गाव आहे. जळगावहून रेल्वेने जायचे तर अडीच दिवस लागतात. मुंबईमार्गे विमानाने जायला एक दिवस लागतो. रेल्वे वा विमान कसेही जा, गोहात्तीपासून पुढे सात ते आठ तासांचा बसचा प्रवास करावाच आहे. पुढच्या महिन्यात त्याचीही परीक्षा आहे. त्यामुळे तो दिवाळीला घरी गेला नाही. घरी आई-वडील, बहिण व भाऊ आहेत. त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करायला मिळणार नाही पण जळगावमध्ये मित्रांसोबत दिवाळी साजरी करू, असे मिरांगा म्हणाला.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयDiwaliदिवाळी 2022