झंवरकडे केलेल्या तपासात निष्पन्न झालेल्या काही ठळक बाबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:49+5:302021-08-21T04:21:49+5:30
- सुनील झंवर याने त्याचे व मुलाच्या मालकीच्या / भागीदारीतील विविध कंपन्या/फर्ममधील आर्थिक व्यवहार एकत्रित असल्याचे मान्य केले. - ...

झंवरकडे केलेल्या तपासात निष्पन्न झालेल्या काही ठळक बाबी
- सुनील झंवर याने त्याचे व मुलाच्या मालकीच्या / भागीदारीतील विविध कंपन्या/फर्ममधील आर्थिक व्यवहार एकत्रित असल्याचे मान्य केले.
- बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता खरेदीसाठी ठेवीदार राजेंद्र इंगोले, मधुकर पितांबर झंवर व उषा मधुकर झंवर यांच्या ठेव पावत्या स्वत: खरेदी करुन वर्ग केल्याचे मान्य केले.
- कर्जदारांचे कर्ज ठेवीदारांच्या पावत्या २० ते ३५ टक्के रक्कमेमध्ये खरेदी करुन कर्ज निरंक केलेल्या राहुल सुभाषचंद बोहरा, जामनेर, छगन झाल्टे, चंदुभाई पटेल, जितेंद्र रमेश पाटील, प्रेम नारायण कोगटा, धरम सांकला यांना व पावत्या गोळा करणारे एजंट अनिल पगारीया, उदयकुमार कांकरीया, अजय ललवाणी, आकाश माहेश्वरी, विवेक ठाकरे, रमेश जैन, अजय जैन, अशोक रूणवाल यांना ओळखत असल्याबाबत सांगितले आहे.
- बीएचआर पतसंस्थेचा सॉफ्टवेअर बनवणारा कुणाल शहा याने आपल्या साई सेवा पार्सल या कंपनीचे सॉफ्टवेअर यापूर्वी बनविल्याचे व त्यांचे आर्थिक संबंध असल्याचे झंवरने मान्य केले आहे.
- गुन्हा दाखल झाल्यापासून आपण इंदौर व नाशिक येथे राहिलो असल्याचे सुनील झंवर तपासात सांगितले आहे. अटक आरोपीस नाशिक येथे नेऊन तपास करण्यात आला. तसेच इंदौर येथे अवसायक कंडारे यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे राहत असल्या बाबत सांगितले. परंतू त्या व्यक्तीच्या नाव, पत्त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.
- कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्याकरीता ठेवी आणुन देणा-या एजंट आकाश माहेश्वरी हा आपल्या शालेय पोषण आहाराचा ठेकेदार असल्याचे झंवरने मान्य केले आहे.