कळमोदा येथे सैन्य दलातील जवानांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:29+5:302021-08-22T04:18:29+5:30
उटखेडा, ता. रावेर : भारतीय राष्ट्रीय युवा परिषद व ग्रामस्थ यांच्यातर्फे कळमोदा, ता. रावेर येथे सैन्य दलातील जवानांचा ...

कळमोदा येथे सैन्य दलातील जवानांचा सत्कार
उटखेडा, ता. रावेर : भारतीय राष्ट्रीय युवा परिषद व ग्रामस्थ यांच्यातर्फे कळमोदा, ता. रावेर येथे सैन्य दलातील जवानांचा सत्कार करण्यात आला.
सैन्य दलामध्ये सेवा बजावत असलेले येथील भूमिपुत्र एकनाथ बोंडे हे अमृतसर (पंजाब) या ठिकाणी सेवा बजावत आहेत, तर अनिल पाटील हे बीएसएफ कॉन्स्टेबल, पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहेत. हिरामण वाघ हे सेवानिवृत्त असून त्यांनी ४० वर्ष सैन्य दलात सेवा बजावली. यांचा सत्कार पोलीस पाटील हर्षाली जावळे, बिपीन बांडे, भारत कुवर, ग्रा. पं. सदस्य प्रदीप वाघ व प्रशांत जावळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नीलेश बाक्षे, मुकेश महाराज, चिंधू पाटील, चेतन बोंडे, अमोल बाक्षे, लोकेश बोंडे, खुशाल बोंडे, राहुल पाटील, योगेश बोंडे, संदीप पाटील, भुनेश्वर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
सैन्यदलातील जवानांचा सत्कार करताना ग्रामस्थ.