A soldier from Shindi in Chalisgaon taluka died while undergoing treatment at Nashik | चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यूशिंदी, ता.चाळीसगाव : येथील इंडियन टीबीटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मधील जवान संभाजी धर्मा पानसरे (वय ३१) यांचे दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले.
ते २०११ मध्ये नाशिक येथे भरती झाले होते. उत्तराखंड येथे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर ते छत्तीसगड येथे देशसेवा करीत होते. ते ४ जानेवारी रोजी एक महिन्याची सुटीवर आले होते. पोटाचा अचानक त्रास होत असल्याने त्यांना दिनांक १४ रोजी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना १८ रोजी पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेही त्यांना उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही आणि तेथेच २६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर २७ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळ गावी शिंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाची एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
ते एसटी परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी धर्मा महादू पानसरे यांचे चिरंजीव, तर देवीदास धर्मा पानसरे यांचे लहान बंधू होत.

Web Title: A soldier from Shindi in Chalisgaon taluka died while undergoing treatment at Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.