मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: September 27, 2015 00:13 IST2015-09-27T00:13:13+5:302015-09-27T00:13:13+5:30
नंदुरबार : मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना नवापूरनजीक विजापूरजवळ घडली.

मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार
नंदुरबार : मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना नवापूरनजीक विजापूरजवळ घडली. मोटारसायकलस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर विनेश कोरज्या गावीत, रा.भामरामाळ, ता.नवापूर व राहुल रवींद्र वसावे रा.जागतलाव, ता.नवापूर हे आपापल्या मोटारसायकलीने (क्रमांक एमएच 39-डी 9031 व एमएच 39 आर 1934) भरधाव जात होते. विजापूरनजीक रस्त्यावर मधोमध दोन्ही मोटारसायकली समोरासमोर धडकल्या. त्यात विनेश कोरज्या गावीत यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शीतल सुकदेव गावीत व राहुल रवींद्र वसावे दोन्ही रा.जामतलाव हे जखमी झाले. त्यांना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत दिनेश कोरज्या गावीत यांच्या फिर्यादीवरून विनेश गावीत व राहुल वसावे यांच्याविरुद्ध मोटार अपघातान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार वराडे करीत आहेत.