शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षणामुळे शेतीचे आधुनिकीकरण करता येईल-गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 18:50 IST

अमळनेर बाजार समितीच्या पातोंडा येथे पेट्रोल पंप भूमिपूजन आणि माती परीक्षण यंत्राचे भूमिपूजन

संजय पाटीलअमळनेर : शेतकरी भिकारी नाही, तो दान करणारा आहे. त्याच्यात सहन करण्याची क्षमता आहे. माती परीक्षण म्हणजे माणसाच्या शरीराची चाचणी करण्यासारखे आहे. त्यामुळे शेतीचे आधुनिकीकरण करता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पातोंडा येथील पेट्रोलपंप भूमिपूजन व माती परीक्षण यंत्राच्या उदघाटनप्रसंगी केले.यावेळी त्यांनी जिल्ह्यात ५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजना आणून थेट जनतेपर्यंत पिण्याचे पाणी पोहचविणार असल्याचेही सांगितले.गुलाबराव पुढे म्हणाले की, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक महिला असल्या तरी त्यांची कामे शेतकरी हिताची आहेत. आमदार अनिल पाटील यांनी पातोंडा, मठगव्हान, रुंधाटी, गंगापुरी, मुंगसे, दापोरी परिसरातील हजारो एकर शेतीतील वर्षानुवर्षाची पाण्याचा निचरा न होण्याची समस्या सांगून त्यावर विशेष योजना तयार करण्याची विनंती केली.विशेष टोपीमाजी आमदार साहेबराव पाटील यांनी २०१७ पासूनच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला गुलाबरावानी आणून दिल्याबद्दल त्यांचा विशेष टोपी घालून सत्कार केला.माजी आमदार दिलीप सोनवणे, इंडियन ऑईलचे अश्विन यादव, ए.जी. ट्रान्स.चे एम. डी. अजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविकात अवघ्या काही महिन्यात बाजार समितीत सुरू होत असलेल्या शेतकरी हिताच्या नवनवीन योजनांची माहिती दिली.व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, बाजार समितीचे प्रशासक प्रा. सुरेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, संभाजी पाटील, जितेंद्र राजपूत, एल. टी. पाटील, भाईदास अहिरे, पातोंडयाचे भरत बिरारी , जीनमालक केदार पवार, बाजार समितीचे माजी संचालक हरी भिका वाणी, निवृत्त अपर पोलीस अधीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी उपस्थित होते.विशेष सत्कारबाजार समितीची हायटेक यंत्रणा राबवून आयएसओ मानांकन मिळवल्याबद्दल केशवा व्हिजनचे संचालक गणेश भामरे तसेच बाजार समितीचे प्रकल्पांचे कामकाज व्यवस्थित हाताळून यश मिळवणारे लिपिक बापू पाटील व गणेश पाटील यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अनिल शिसोदे, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुरेश पाटील, विक्रांत पाटील , मनोज पाटील, पं. स. सदस्य विनोद जाधव, भागवत पाटील, रिटा बाविस्कर, कविता पवार, आशा चावरीया, अलका पवार, योजना पाटील हजर होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.