पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चाळीसगावातील सामाजिक संस्था पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:03+5:302021-09-06T04:20:03+5:30

महिला काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना साड्या व ब्लॅंकेटचे वाटप चाळीसगाव : जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील ...

Social organizations in Chalisgaon continue to help the flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चाळीसगावातील सामाजिक संस्था पुढे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चाळीसगावातील सामाजिक संस्था पुढे

महिला काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना साड्या व ब्लॅंकेटचे वाटप

चाळीसगाव : जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट घेत धीर दिला. त्यानंतर बामोशी बाबा दर्गा परिसरात व तालुक्यातील वाकडी येथे महिला काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अर्चना पोळ यांच्यातर्फे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्तांना आपुलकीची मदत म्हणून १५० साड्या व १५० ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला बचत गट अध्यक्षा कुसुम खरटमल, छाया खरटमल, मंगला खरटमल यांच्यातर्फे आर्थिक मदत मिळाली. याप्रसंगी अजबराव पाटील, राहुल मोरे, शिवलाल साबणे, रवींद्र पोळ, अमोल राऊळ, शिवाजी आप्पा राजपूत, केदारसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, आर. डी. चौधरी, बापू चौधरी, प्रदीप देशमुख, नीलेश बडक, मधू गवळी, युवक काँगेस शहर अध्यक्ष प्रज्वल जाधव, रवींद्र जाधव, समीर शेख, रमेश शिंपी, अशोक खलाणे, देविदास खरटमल, आनंद गांगुर्डे, नितीन पवार, मोहन बारसे, नितीन राजपूत, नितीन सूर्यवंशी, प्रा. डी. ओ. पाटील, पंकज शिरुडे, लता पगारे, तुळसा मोरकर, भाविका पोलडिया आदी उपस्थित होते.

050921\05jal_9_05092021_12.jpg~050921\05jal_10_05092021_12.jpg

चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना डॉ. संदीप देशमुख, रोशन ताथेड, ब्रिजेश पाटील व इतर~चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना साडी वाटप करताना जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील. सोबत अर्चना पोळ,रवींद्र पोळ व पदाधिकारी

Web Title: Social organizations in Chalisgaon continue to help the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.