सा़बां़ अभियंत्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:26 IST2017-03-03T00:26:52+5:302017-03-03T00:26:52+5:30

भाजपाची पत्रकार परिषद : माजी आमदारांवर टीकेची झोड

Sniffer engineers | सा़बां़ अभियंत्यांना शिवीगाळ

सा़बां़ अभियंत्यांना शिवीगाळ

भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस़ वाय़ कुरेशी यांना रात्री ईल भाषेत शिवीगाळ केली, शिवाय  आमदार संजय सावकारे व जलील कुरेशी यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकाराचा भाजपाच्या पत्रकार परीषदेत निषेध करण्यात आला़
उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, चौधरी यांच्यासह गटनेता उल्हास पगारे व कार्यकत्र्यानी काल रात्री शासकीय विश्रामगृहात केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आह़े आमदार निधीतून लावण्यात आलेला बाक हटवावा यासाठी चौधरींनी शिवीगाळ केली़ निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते असे उपद्व्याप करीत आहेत़ पोलिसांकडे आम्ही तक्रार करणार आहोत़ यापूर्वीही कुरेशींना चौधरींनी शिवीगाळ केली होती़ बाकावरचे नावही पुसण्यात आल़े  प्रा़ सुनील नेवे म्हणाले की, या घटनेबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कल्पना दिली आह़े 
प्रसंगी मुन्ना तेली, रमेश मकासरे, किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, शफी पहिलवान, निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, गिरीश महाजन, अॅड़बोधराज चौधरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होत़े
चौधरींकडून जीवाला धोका : एस़वाय़ कुरेशी
4माजी आमदार संतोष चौधरींनी काल रात्री अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली़ याबाबत कार्यकारी अभियंता नारखेडे, अभियंता संघटनेचे अध्यक्ष पांढरे, उपअभियंता मौर्या यांना प्रत्यक्ष लेखी माहिती कळवली आह़े माजी आमदारांकडून असे वर्तन अपेक्षित नव्हत़े रात्री 11़45 वाजेच्या सुमारास मुलाला शासकीय विश्रामगृहातील बाक उचलण्यास भाग पाडण्यात आल़े आपल्या  कुटुंबाचे काही बरे-वाईट झाल्यास संबंधित जबाबदार राहतील़ मुलाचे भवितव्य पाहून आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही़

Web Title: Sniffer engineers