शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

जळगावातील विद्यार्थ्यांनी तयार केले स्मार्ट सीटीचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 7:51 PM

एस.एस.बी.टी.अभियांत्रिकीतील ई अँड टी.सी.विभागाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती केली आहे. घराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

ठळक मुद्देएस.एस.बी.टी.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधनघराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भरसर्व सुरक्षा युक्त अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर

जळगाव : एस.एस.बी.टी.अभियांत्रिकीतील ई अँड टी.सी.विभागाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती केली आहे. घराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे.स्मार्ट सिटी मधील महत्वाची उद्दिष्टेहा प्रकल्प पूर्णपणे आॅटोमॅटिक असून तो आजच्या काळाच्या आय.ओ.टी संकल्पनेवर आधारित आहे. यात प्रामुख्याने घर स्वयंचलन, वीजनिर्मिती आणि वाहतूक नियंत्रण ही तीन उद्दिष्टे समाविष्ट करण्यात आली आहे.शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी कोमल पाटील, मयूर पाटील, मोनिका राजपूत, प्रेरणा साळी यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांना प्रा. प्रियंका शानभाग, प्रा.अमोल वाणी व विभागप्रमुख डॉ. एस.आर. सुरळकर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व सुरक्षा युक्त अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापरस्मार्ट सिटी मॉडेलमध्ये सर्व सुरक्षा सुविधांनी उपयुक्त असलेले अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रोग्राम आणि हार्डवेअरच्या मदतीने बनविले आहे. या अ‍ॅप्लिकेशनचा गाभा ओर्डिनो आहे. ओर्डिनो हा कमी ऊर्जेवर कार्यरत होत असल्यामुळे आवश्यक तेवढीच ऊर्जा पुरवण्यासाठी स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला आहे. सुरक्षा आणि नियंत्रणाच्या दृष्टीने एल.डी.आर., टेम्परेचर आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर वापरले आहेत. घराच्या सुरक्षिततेसाठी आरएफआयडी टॅग व रीडर वापरण्यात आले आहे. सर्व प्रोजेक्ट उपकरण आणि ओर्डिनो व वाय-फाय मोड्युल्ड हे मोबाईल फोनला जोडण्यात आले आहे. गतिरोधक पार करत असतांना ऊर्जा निर्मिती साठी लोड सेल्सचा वापर केला आहे.अचानक आग लागल्यास मोबाईवर येणार संदेशघरात अचानक आग लागल्यावर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण सक्रिय होऊन भोंगा वाजेल व मोबाईलवर संदेश येईल. सुरक्षा उद्देशामध्ये अधिकृत आणि अनधिकृत कार्डचा वापर केला असून आरएफआयडी रीडर सुरक्षा उपकरणाला जोडलेला आहे. वाहतूक नियंत्रण यात प्रामुख्याने पार्किंग समस्येला लक्षात घेऊन बनविली आहे. यामध्ये पार्किंग जागा रिकामी आहे हे एलसीडी डिस्प्लेवर सूचित करण्यात येईल.घर्षणामुळे होणार वीजनिर्मितीअपघात नियंत्रण दृष्टीने एलसीडी डिस्प्लेवर ट्रॅफिक हालचाल सुरक्षा सूचित करण्यात येईल. ज्यामुळे वेळेची बचत होईल. गतिरोधक पार करत असतांना वाहन आणि रोड यांच्यात होणाऱ्या घर्षणामुळे वीजनिर्मिती होते. या विजेचा वापर आॅटोमॅटिक स्ट्रीट लाईटसाठी करण्यात येईल. ज्यामुळे विजेची बचत करता येईल.

टॅग्स :JalgaonजळगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र