जि.प.शाळेतील वर्ग खोलीचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 18:12 IST2017-09-27T18:08:17+5:302017-09-27T18:12:46+5:30
गोजोरे जि.प.शाळेतील घटना. सुदैवाने जिवितहानी टळली

जि.प.शाळेतील वर्ग खोलीचा स्लॅब कोसळला
आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.२७ : तालुक्यातील गोजोरे येथील जि.प.शाळेतील वर्ग खोलीचा स्लॅब बुधवारी सकाळी १० वाजता कोसळला, दरम्यान, वर्ग खोली बंद असल्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली.
तालुक्यातील गोजोरे येथील जि.प.शाळतील जिर्ण झालेल्या खोलीचा स्लॅब अचानक कोसळला. या शाळेत एकूण १० वर्ग खोल्या आहेत. १७१ विद्यार्थी संख्या आहे. स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी भयभीत झाले आहेत. दोन दिवसापूर्वीच पाल येथील जि. प.शाळेचा स्लॅब कोसळला होता.
घटनेची माहिती जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांना दिली. तत्काळ पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मुख्याध्यापिका सुनीता डोळे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, वर्गखोलीची दुरूस्ती करण्यासाठी तीन वेळा प्रस्ताव पाठविलेला आहे. स्लॅब पडलेली वर्गखोली बंद होती.