जळगाव बसस्थानकातील स्लॅब कोसळून प्रवासी जखमी

By Admin | Updated: April 25, 2017 17:55 IST2017-04-25T17:55:04+5:302017-04-25T17:55:04+5:30

बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग मंगळवारी दुपारी अचानक कोसळल्याने गोकुळ आत्माराम बाविस्कर (34, रा.मोहाडी,ता.जामनेर) हा प्रवासी जखमी झाला आहे

Slab in Jalgaon bus stand collapses, injures passengers | जळगाव बसस्थानकातील स्लॅब कोसळून प्रवासी जखमी

जळगाव बसस्थानकातील स्लॅब कोसळून प्रवासी जखमी

 जळगाव,दि.25- नवीन बसस्थानकातील कॅन्टीनजवळील स्लॅबचा काही भाग मंगळवारी दुपारी अचानक कोसळल्याने गोकुळ आत्माराम बाविस्कर (34, रा.मोहाडी,ता.जामनेर) हा प्रवासी जखमी झाला आहे.

जखमी गोकुळ बाविस्कर हे मंगळवारी जळगावातील दवाखान्यात उपचारासाठी आले होते. उपचार घेऊन घरी परत जात असताना दुपारी 2 वाजता नवीन बसस्थानकात ही घटना घडली. एस.टी.चे अधिकारी निलिमा बागुल व बाळासाहेब पाटील यांनी जखमी गोकुळ बाविस्कर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बाविस्कर यांच्या हाताला व डोक्याला मार बसला आहे.

Web Title: Slab in Jalgaon bus stand collapses, injures passengers