विजयाचा षटकार..!

By Admin | Updated: October 20, 2014 09:59 IST2014-10-20T09:59:45+5:302014-10-20T09:59:45+5:30

मुक्ताईनगर विधानसभामतदारसंघात सलग सहाव्यांदा विजय मिळवून एकनाथराव खडसे यांनी विजयाचा षट्कार मारला आहे.

Sixs of victory ..! | विजयाचा षटकार..!

विजयाचा षटकार..!

मुक्ताईनगर विधानसभामतदारसंघात सलग सहाव्यांदा विजय मिळवून एकनाथराव खडसे यांनी विजयाचा षट्कार मारला आहे.खडसे यांचा नऊ हजार ७0८ मतांनी विजय झाला आहे.विजयासाठी झुंज द्यावी लागली नसली तरी शिवसेनेचे चंद्रकांत पाटील या नवख्या उमेदवारानेही मतदारसंघात शिवसेनेची पाळेमुळे रोवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.निवडणूक निकालात प्रतिस्पर्धी चंद्रकांत पाटील वगळता उर्वरित सर्व१५ उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अरुण पांडुरंग पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे योगेंद्र पाटील, मनसेचे राजेंद्र सांगळकर या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.खडसेंना गेल्या पाच निवडणुकींमध्ये कडवी झुंज देणार्‍या राष्ट्रवादी पक्षाला या निमित्ताने स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठी कस लावणारा हा निकाल होय. एकंदरीत मतदारसंघात राष्ट्रवादीचा मतदार सेनेच्या भगव्याखाली ओढला गेल्याचे चित्र यातून समोर आले आहे. मतमोजणी दरम्यान खडसेंनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. ती शेवटच्या फेरीपर्यंत विजयी मताधिक्यापर्यंत कायम राहिली. मतमोजणी दरम्यान फेरीनिहाय चढ-उतारात रावेर तालुक्यात सुमारे पाच हजार ८४0 ची आघाडी, मुक्ताईनगर तालुक्यात पाच हजार ७७४ मताधिक्य, तर बोदवड तालुक्यातून दोन हजार ३१८ मतांची पिछाडी खडसेंना मिळाली. 

खडसेंच्या विजयाने मतदारसंघात मुख्यमंत्रिपदाची आशा करण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे.उत्तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व पक्षात ज्येष्ठतेनुसार खडसेंचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. पाठोपाठ विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री पदाचा दावेदार या राजकीय संकेतानुसार मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ या नावाने मुक्ताईनगरची ओळख निर्माण होईल काय ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. निकालादरम्यान टपालाद्वारे आलेल्या मतांच्या मोजणीत एक हजार ३३४पैकी २१८ मते बाद झाली. नोटामध्ये एक हजार २६४ मते नोंदवण्यात आली.

Web Title: Sixs of victory ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.