आईच्या डोळ्यादेखत विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:10+5:302021-09-03T04:18:10+5:30

जळगाव : आई गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढत असताना त्याच वेळी खेळत असलेल्या बालकाचा एसीच्या कॉम्प्रेसरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू ...

Six-year-old dies after electric shock in mother's eyes | आईच्या डोळ्यादेखत विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

आईच्या डोळ्यादेखत विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव : आई गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढत असताना त्याच वेळी खेळत असलेल्या बालकाचा एसीच्या कॉम्प्रेसरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत घडली. केशव ललित चव्हाण (वय ६) असे मृत बालकाचे नाव आहे. डोळ्यांदेखत एकुलत्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याने मातेने प्रचंड आक्रोश केला.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, वनोली, ता. यावल येथील मूळ रहिवासी असलेले ललित सुरेश चव्हाण यांचे बी.जे. मार्केट येथे न्यू प्रकाश ट्रेडर्स नावाचे सबमर्सीबल शॉप असून विठ्ठलवाडीत वडील सुरेश चव्हाण, आई अलका, पत्नी दिव्या व मुलगा केशव यांच्यासह वास्तव्याला आहेत. पत्नी दिव्या या दुपारी तीन वाजता गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता मुलगा केशवदेखील त्यांच्या मागे आला. आई कपडे काढत असताना खेळतानाच त्याचा एसीच्या कॉम्प्रेसरला धक्का लागला. त्यात वीज प्रवाह असल्याने केशव जागेवरच कोसळला. आवाज आल्याने आईने मागे वळून बघितले असता मुलगा निपचित पडला होता, तो काहीच बोलत नव्हता. घाबरलेल्या दिव्या यांनी हंबरडा फोडत आरडाओरड केली. शेजारच्यांच्या मदतीने गल्लीतील डॉक्टरकडे नेले असता, त्यांनी दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. दादावाडीतील दवाखान्यात पोहोचण्याच्या आतच आईच्या मांडीवर त्याची प्राणज्योत मालवली. दवाखान्यात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

एकुलता मुलगा गेल्याने धक्का

दिव्या व ललित यांना केशव हा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे या दाम्पत्याला मोठा धक्का बसला असून, गल्लीतील नागरिक तसेच नातेवाइकांकडून त्यांना धीर दिला जात होता. दरम्यान, तो मोबाइलवरच ऑनलाइन शिक्षण घेत होता. या घटनेमुळे विठ्ठलवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Six-year-old dies after electric shock in mother's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.