शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 16:49 IST2017-04-14T16:49:21+5:302017-04-14T16:49:21+5:30

शिंदखेडा (ता.धुळे) येथून चोरलेल्या सहा दुचाकी एका अल्पवयीन मुलाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

Six-wheelers stolen from Shindkhede seized | शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

>अमळनेर,दि.14-शिंदखेडा (ता.धुळे) येथून चोरलेल्या सहा दुचाकी एका अल्पवयीन मुलाकडून  जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत चार लाख रूपये आहे. संशयितास ताब्यात घेतले आहे.
शिंदखेडा (ता.धुळे) येथील एक 17 वर्षीय मुलगा शहरातील शिरूडनाका भागात कॉलेजचा विद्यार्थी म्हणून भाडय़ाच्या खोलीत राहत असून, तो दुचाकी चोरतो, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन, 13 रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने शिंदखेडा येथून दुचाकी चोरून आणल्या असल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी तो राहत असलेल्या भाडय़ाच्या खोलीच्या भिंतीलगत दडवून ठेवल्या होत्या. तर काही दुचाकी या शहरातील केले नगर भागातील मोकळ्या बखळ जागेतील काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या होत्या. गुन्हे शोध पथकाचे हवालदार संजय पाटील, चंद्रकांत गोसावी, पोलीस नाईक विजय साळुंखे, जनार्दन पाटील, विशाल चव्हाण यांनी या दुचाकींचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत चार लाख रूपये आहे. यातील काही दुचाकींच्या नंबरप्लेट बदलविण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ व त्यांच्या पथकाने केली आहे. संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.(वार्ताहर)
 

Web Title: Six-wheelers stolen from Shindkhede seized