गणेशोत्सवात सहा हजार पोलिसांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:14+5:302021-09-09T04:22:14+5:30

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विविध संवर्गात ६ हजार ६९५ उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना गणेशोत्सवात ...

Six thousand police watch in Ganeshotsav | गणेशोत्सवात सहा हजार पोलिसांचा वॉच

गणेशोत्सवात सहा हजार पोलिसांचा वॉच

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विविध संवर्गात ६ हजार ६९५ उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना गणेशोत्सवात दहा दिवसांसाठी जिल्ह्यातून बाहेर काढले जाणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे उत्सव साजरा करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या उत्सवात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे सीआयडीकडून एका डीवायएसपीची जिल्ह्यात नियुक्ती झाली असून, एक परिविक्षाधीन आयपीएस अधिकारीही देण्यात आलेला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर या उत्सवावर राहणार आहे.

असा आहे जिल्ह्यातील गणेशोत्सव

सार्वजनिक मंडळ : १,७१६

खासगी मंडळ : ६४६

एक गाव एक गणपती : १४९

असा आहे बंदोबस्त

पोलीस अधीक्षक : १

अपर पोलीस अधीक्षक : २

बाहेरील आयपीएस अधिकारी : १

पोलीस उपअधीक्षक : ८

पोलीस निरीक्षक : ३३

सहायक निरीक्षक : ५५

उपनिरीक्षक : ७९

सहायक फौजदार : ३७९

हवालदार : ७९३

पोलीस नाईक : ७९३

पाेलीस कर्मचारी : १,६३२

बाहेरील बंदोबस्त

सीआयडी पुणे डीवायएसपी : १

होमगार्ड : १,६००

महिला : २००

महामार्ग सुरक्षा कर्मचारी : ११०

परिविक्षाधीन उपनिरीक्षक : २०

मरुळ आरपीटीएस : १०

एसआरपी कंपनी : १

Web Title: Six thousand police watch in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.