Six rounds of fire | सहा राऊंड फायर

सहा राऊंड फायर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाच्या वेळी सहा राऊंड फायर झाले आहेत. दुसऱ्या गटातील मनोज शिंदे याने दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी त्याचा लहान भाऊ विजय याचे सोनु सारवान, लखन सारवान, अक्षय सारवान, सुरज व नीलेश हंसकर यांच्याशी वाद झाले होते. पुर्वी विजय त्यांचा मित्र होता. परंतु, किरकोळ कारणावरुन वाद झाल्याने सध्या विजय त्यांच्यात राहत नव्हता. दरम्यान, रविवारी दुपारी शिंदे बंधू घरात झोपलेले असताना सोनु सारवानसह २२ ते २५ जणांचे टोळके त्यांच्या घरासमोर आले. या तरुणांच्या हातात पिस्तूल, तलवार, चॉपर होते. त्यांनी शिवीगाळ करीत घरावर दगडफेक सुरू केली. यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांनी शिवीगाळ करुन घरावर दगडफेक केली. एका तरुणाने पिस्तुलचा धाक दाखवला. परिसरातील नागरिक घराबाहेर येत असल्याचे पाहून जमाव पळुन गेला.

Web Title: Six rounds of fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.