भाजपचे अजून सहा नगरसेवक वेटिंगवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:34+5:302021-06-02T04:13:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील भाजपला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून, भाजपचे अजून ६ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर ...

Six more BJP corporators waiting? | भाजपचे अजून सहा नगरसेवक वेटिंगवर?

भाजपचे अजून सहा नगरसेवक वेटिंगवर?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेतील भाजपला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून, भाजपचे अजून ६ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ न भेटल्यामुळे हा प्रवेश थांबला असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ भेटल्यावर पुढील आठवड्यात भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उप-महापौर निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली; मात्र त्यानंतरदेखील भाजपचे नगरसेवक शिवसेनेत जाण्याचा ओघ कमी होताना दिसून येत नाही. शनिवारी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता अजून सहा नगरसेवकदेखील शिवसेनेच्या संपर्कात आल्याचा दावा सेना नगरसेवकांकडून केला जात आहे. यासाठी थेट मुंबईहून सूत्र हलवली जात असल्याचेही सेना नगरसेवकांनी सांगितले. प्रभागातील विकास कामांसाठी निधी देण्याची ग्वाहीदेखील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून नगरसेवकांना दिली गेली असून, पुढील आठवड्यात पुन्हा सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे नगरसेवक मुंबईत डेरेदाखल

गेल्या तीन दिवसांपासून महापौर जयश्री महाजन, उप-महापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृहनेते ललित कोल्हे यांच्यासह नवग्रह मंडळातील काही नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहेत. सोमवारी महापौर व उप-महापौर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची विनंती केली आहे, तर मंगळवारीदेखील नगरसेवकांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेटदेखील घेतल्याची माहिती सेनेच्या नगरसेवकांनी दिली आहे.

भाजपचे पाच नगरसेवक मंगळवारी होते जाणार?

शिवसेनेकडून भाजपचे अजून सहा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे, तसेच मंगळवारी सायंकाळी भाजपचे पाच नगरसेवक मुंबईला जाण्याच्या तयारीत होते; मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ न मिळाल्यामुळे या नगरसेवकांना जळगावला थांबायला सांगितले, तसेच मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यावर या नगरसेवकांचा प्रवेश केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिली आहे.

कोट.

अजून काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा प्रवेशदेखील केला जाईल. वेळ आल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल.

- कुलभूषण पाटील, उप-महापौर.

Web Title: Six more BJP corporators waiting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.