चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सहा महिन्याच्या बालिकेस पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 18:13 IST2019-08-08T18:13:13+5:302019-08-08T18:13:22+5:30

पोलिसात गुन्हा दाखल

Six-month-old girl fled from Chalisgaon railway station | चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सहा महिन्याच्या बालिकेस पळविले

चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सहा महिन्याच्या बालिकेस पळविले


चाळीसगाव - रेल्वे स्थानकावर झोपलेल्या सहा महिन्याच्या बालिकेस मुलगी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना नुकतीच घडली.
पळविलेल्या मुलीचे नाव चैताली बाबूलाल पाटील असे असून ४ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक १ वर वेटींग रुमच्या मागील बाजूस ही बालिका आईसह झोपलेली होती. ही संधी साधून चोरट्यांनी उचलून नेले. याप्रकरणी रेल्वे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
या बालिकेची आई रोशनी बाबुलाल पाटील रा.तरवाडे ता.चाळीसगाव,( ह.मु.मोतीबाग मालेगाव ) ही बामोशी बाबांच्या दर्गावर उपचार घेत असलेल्या आईला भेटण्यासाठी व तिला घरी नेण्यासाठी येथे आली असताना ही घटना घडली.
रोशनीची आई कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळे रोशनी ही चैतालीसह चाळीसगाव प्लॅटफार्मवर झोपलेली होती. दरम्यान रोशनी हिने चैतालीला झोपलेल्या स्थितीत सोडून जवळच असलेल्या बाथरुमला गेली होती. १० मिनीटनतंर पुन्हा झोपलेल्या जागी ती आली असता तिला त्याठिकाणी मुलगी दिसली नाही.यानंतर रेल्वेस्थानकावर सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी चैतली मिळून आली नाही. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोणास याबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Web Title: Six-month-old girl fled from Chalisgaon railway station