तीन खेळाडूंना सहा लाखांची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:15+5:302021-05-05T04:27:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : क्रीडा आणि युवक सेवा संचलनालयाने आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत भारतीय संघातून खेळणाऱ्या जळगाव शहरातील तीन ...

तीन खेळाडूंना सहा लाखांची शिष्यवृत्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : क्रीडा आणि युवक सेवा संचलनालयाने आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत भारतीय संघातून खेळणाऱ्या जळगाव शहरातील तीन खेळाडूंना राज्य क्रीडा विकास निधीतून प्रत्येकी दोन लाख असे एकुण सहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव चौधरी याने कॅनडात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपली छाप सोडली होती. छाया बेंडाळे हिने जकार्ता, इंडोनेशियात झालेल्या आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तर शिवानी देशमुख हिने चीन मध्ये झालेल्या आशियाई विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याबद्दल त्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, नगरसेवक नितीन बरडे, शिवसेना शहर प्रमुख शरद तायडे, अरुण श्रीखंडे, अरुण गावंडे, सुमेध तळवेलकर, विनोद कुलकर्णी उपस्थित होते.