एमआयडीसीत सहा तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:49+5:302021-09-22T04:20:49+5:30
जळगाव : सोमवारी शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तब्बल नऊ तास वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला असताना, मंगळवारी पुन्हा ...

एमआयडीसीत सहा तास वीजपुरवठा खंडित
जळगाव : सोमवारी शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तब्बल नऊ तास वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला असताना, मंगळवारी पुन्हा एमआयडीसीत सहा तास वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे एमआयडीसीतील जी १ सेक्टर मधील मुख्य विद्युत लाइनवरील डीपीत मोठा आवाज होऊन तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तब्बल सहा तास लागले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला होता. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे एमआयडीसीतील अनेक उद्योगांचे कामकाज बंद पडले होते. यामुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे महावितरण प्रशासनाने एमआयडीसीसाठी अतिरिक्त सब स्टेशन उभारण्याची मागणी उद्योजकांमधून करण्यात येत आहे. तसेच शहरातील अनेक भागातही सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.