जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:34 PM2017-12-13T12:34:00+5:302017-12-13T12:35:53+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Six gangs of rebels rebel in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्देभुसावळ शहरात ऑक्टोबर महिन्यात चार घरफोडय़ा घरफोडी व एक दुचाकी चोरल्याची कबुली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- जिल्ह्यातील मोठय़ा शहरात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून 40 हजार 500 रुपये रोख, दोन कॅमेरे, सोने-चांदीचे दागिने व दुचाकी असा 84 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने एकटय़ा भुसावळ शहरात ऑक्टोबर महिन्यात चार घरफोडय़ा केल्या आहेत. 
अटक केलेल्यांमध्ये आकाश भानदास गोरखा (19), अभिषेक प्रदीप भालेराव (19) दोन्ही रा.रेल्वे क्वार्टर, भुसावळ, आकाश उर्फ टेके शाब्बास रामटेके (20, रा.लिटी, जि.चंद्रपुर, ह.मु.भुसावळ), आकाश रमेश परदेशी (वय 21, रा. कवाळे नगर, भुसावळ), भूषण नाना राठोड (22 रा.भुसावळ) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
रेल्वेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सिध्दीश ईश्वरचंद जायस्वाल (47, रा.रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) यांच्याकडे 17 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत 18 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आकाश गोरखा हा हाती लागला. त्याची चौकशी केली असता अभिषेक भालेरावचे नाव पुढे आला. पोलीस चौकशीत घरफोडी करणारी सहा जणांची टोळी असून आकाश रामटेके हा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने रामटेके याला ताब्यात घेतले. चौकशीत आणखी तीन जणांची नावे पुढे आली. त्यानुसार आकाश परदेशी, भूषण राठोड व एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. या सहा जणांना एकत्र आणल्यावर त्यांनी भुसावळ शहरात चार ठिकाणी घरफोडी व एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
 त्यांच्याकडे 40 हजार 500 रुपये रोख मिळून आले. त्यानंतर दुचाकी (क्र.एम.एच.19 ए.एच.3600) , सोने-चांदीचे दागिने व दोन कॅमेरे असा मुद्देमाल हस्तगत केला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील सहायक निरीक्षक राजेंद्र होळकर, सागर शिंपी, कर्मचारी रवींद्र पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश महाजन, विजय पाटील, संजय पाटील, युनुस शेख, विलास पाटील, दीपक पाटील, नरेंद्र वारुळे, प्रवीण हिवराळे, अशोक पाटील, शरद सुरळकर व गायत्री सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Six gangs of rebels rebel in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.