नगररचनातील सहा अभियंते निलंबित

By Admin | Updated: October 8, 2015 00:55 IST2015-10-08T00:55:58+5:302015-10-08T00:55:58+5:30

जळगाव :आयुक्तांनी सहा अभियंत्यांना विभागीय चौकशी होईर्पयत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नगररचना सहायक संचालक यांनी स्वत:हून रजेवर जाण्याचे ठरविले आहे.

Six Engineers suspended in the municipality | नगररचनातील सहा अभियंते निलंबित

नगररचनातील सहा अभियंते निलंबित

जळगाव : मनपा नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरोधात दिलेल्या पत्रामुळे चिडलेल्या सदस्यांनी या सहा अभियंत्यांना निलंबित करून चौकशी करण्याचा ठराव केला होता. त्यावर कारवाईस विलंब होत असल्याने विविध पक्षाच्या नगरसेवकांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. अखेर आयुक्तांनी या सहा अभियंत्यांना विभागीय चौकशी होईर्पयत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नगररचना सहायक संचालक यांनी स्वत:हून रजेवर जाण्याचे ठरविले असून 15 दिवसांची वैद्यकीय रजा टाकली आहे.

गैरकारभार व नागरिकांच्या तक्रारीचे कारण देत नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्या निलंबन ठराव करण्यात आला होता. या ठरावाला विखंडनासाठी पाठविताना त्यासोबत नगररचनातील सहायक नगररचनाकार अरविंद भोसले, रचना सहाय्यक योगेश वाणी, गोपाल लुल्हे, सतिष परदेशी, संजय पाटील व नरेंद्र जावळे या सहा अभियंत्यांनी सदस्यांकडून दबाव आणला जातो.

निलंबनाचा ठरावही वैयक्तिक स्वार्थापोटी व दबाव आणून केल्याचा आरोप करणारे पत्र दिले असल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. त्याबाबत महासभेत मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी लक्षवेधी मांडून लक्ष वेधले होते.

पत्र देणा:या नगररचनातील सहा अधिका:यांना निलंबित करण्याचा तसेच नगररचनातून बदली करून पुन्हा त्या विभागात कधीही नियुक्ती न देण्याचा, त्यांच्या काळातील परवानग्यांची निवृत्त नगररचना संचालक, सहा. संचालकांमार्फत चौकशी करण्याचा व त्यात दोषी आढळल्यास संबंधीतांना बडतर्फ करण्याचा ठराव महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता.

तसेच निकम यांनाही शासनाकडून कारवाई होईर्पयत सक्तीने रजेवर पाठवावे, कामकाज करू देऊ नये, अशी मागणीही सदस्यांनी केली होती. मात्र त्यावर अंमलबजावणी होत नव्हती.

महासभेत त्यावरून आयुक्त व खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांच्यात जोरदार वादही झाला होता. आयुक्तांनी निकम यांना रजेवर पाठविण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगितले होते. तर सहा अभियंत्यांची नियमानुसार चौकशी करूनच कारवाई होईल, असे ठणकावून सांगितले होते.

निकम रजेवर

तर नगररचना सहायक संचालक चंद्रकांत यांना रजेवर पाठविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांच्यावर अविश्वास असल्याने त्यांना काम करू देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी निकम यांना सक्तीने रजेवर पाठविण्याचे अधिकार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. अखेर निकम यांनाच बोलावून त्यांच्याशी आयुक्तांनी चर्चा केली. त्यावर निकम यांनी आपण स्वत:हूनच रजेवर निघून जातो, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी 15 दिवसांची वैद्यकीय रजेचा अजर्ही दिला आहे. याबाबत मनपा आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाचे आदेश दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र याबाबतचे लेखी आदेश गुरूवारी काढले जाणार असल्याचे समजते.

यांचे झाले निलंबन

तत्कालीन सहायक नगररचनाकार अरविंद भोसले, रचना सहाय्यक योगेश वाणी, गोपाल लुल्हे, सतिष परदेशी, संजय पाटील व नरेंद्र जावळे.

माङयासमोर चर्चा सुरू होती. सक्तीने रजा देण्याचे अधिकार नसल्याचे आयुक्तांनी सदस्यांना सांगितले. त्यामुळे मी स्वत:च रजेवर जातो, असे स्पष्ट केले. पंधरा दिवसांची रजा घेतली आहे. त्यानंतरची भूमिका त्यावेळी ठरवू. -चंद्रकांत निकम, सहायक संचालक, नगररचना

Web Title: Six Engineers suspended in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.