बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:24 IST2019-09-11T22:05:21+5:302019-09-11T23:24:12+5:30
४ वर्षांत पहिल्यांदा महापूर

बोरी धरणाचे १५ दरवाजे उघडले
पारोळा : बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बोरी धरणपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. त्यामुळे ११ रोजी सायंकाळी ६ वाजता धरणाचे १५ दरवाजे उघडविण्यात आले.
९ दरवाजे ०.३० मीटर व ६ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून १० हजार ८३३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
बोरी धरणाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांना मध्येच थांबावे लागते. तसेच धुळे - तामसवाडी, धुळे - तामसवाडी- पाचोरा या बसेसचा मार्ग याच पुलावरून असल्याने ही वाहतूक सेवा बंद झाली आहे.
शाळकरी मुले, शेतकरी, मजूर यांचे हाल होत आहेत. बोरी नदीवर पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.