चोपड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:17 IST2019-11-05T21:16:42+5:302019-11-05T21:17:34+5:30
चोपडा : येथे ९ व १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर ...

चोपड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन
चोपडा : येथे ९ व १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे. खान्देशरत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन ‘स्व.डॉ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’ परिसरात होणार असून विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी व कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, परेश टिल्लू, संचालक मोरेश्वर देसाई, प्रफुल्ल गुजराथी, सोमनाथ बडगुजर, किरण गुजराथी, स्नेहल पोतदार, अशोक जैन, प्रभाकर महाजन, अवधूत ढबू, श्रीकांत नेवे, संजय गुजराथी उपस्थित होते.